IPL 2020 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूची CPL मध्ये तुफान फटकेबाजी!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमासाठी सर्वच संघ संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे दाखल होत आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यात येणार आहे आणि कोरोना व्हायरसमुळे सर्व संघ एक महिना आधीच युएईत दाखल झाले आहेत. यंदाची आयपीएल कोण जिंकणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यातच कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( सीपीएल 2020) तुफान फटकेबाजी करत आहे. विशेष म्हणजे सीपीएलमध्येही तो शाहरुख खानची मालकी हक्क असलेल्या संघाकडूनच खेळतो.

रोहित शर्मा पत्नी अन् मुलीसह झाला यूएईसाठी रवाना; RCB, DC, CSKनंही घेतली भरारी

सीपीएलमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सनं सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. जमैका थलाव्हास संघाचे 136 धावांचे लक्ष्य रायडर्सनी 7 विकेट्स राखून सहज पार केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या थलाव्हास संघानं ग्लेन फिलिपच्या फटकेबाजीच्या जोरावर 8 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. फिलिप्सने 42 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचताना 58 धावा केल्या. त्याला आसीफ अली (22) आणि आंद्रे रसेल ( 25) यांची साथ मिळाली. अली खान आणि जेडन सील्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्…

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची ‘मसल्स’ पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर!

प्रत्युत्तरात सुनील नरीन आणि कॉलीन मुन्रो यांनी फटकेबाजी करून रायडर्सला एकहाती विजय मिळवून दिला. नरीननं 38 चेंडूत 7 चौकार व 2 षटकार खेचून 53 धावा केल्या, तर मुन्रोनं 46 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 49 धावा केल्या. नरीननं गोलंदाजीत एक विकेट घेतल्यानंतर फलंदाजीतही कमाल दाखवली. सीपीएलमध्ये त्यानं सलग दोन सामन्यांत अर्धशतक झळकावले. नरीननं पहिल्या सामन्यात अॅमेझॉन वॉरियर्सविरुद्ध 50 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *