सौमित्र चॅटर्जी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं. कोव्हिडशी निगडीत गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. ते 85 वर्षांचं होते.

ऑस्करविजेते दिग्दर्शक सत्यजित रे यांच्याबरोबर सौमित्र यांनी काम केलं होतं.

त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा प्रदीर्घ काळ विस्तारली होती. सौमित्र यांनी तीनशेहून अधिक चित्रपटात अभिनय केला. ते संहितालेखक, रंगभूमीकार आणि कवीही होते.

काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आली. मात्र त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

अप्पू ट्रायॉलॉजीतील अपूर संसार हा सौमित्र यांचा पहिला चित्रपट. सत्यजित रे यांच्या 14 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली.

2012मध्ये सौमित्र यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. 2004 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार द ऑनरने गौरवण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *