पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मागची साडेसाती थांबेना, न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

न्यूझीलंड दौर्‍यावरील पाकिस्तानचे सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची पुष्टी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) केली आहे. क्राईस्टचर्च येथे जैव- सुरक्षित वातावरणात असलेल्या काही सदस्यांनी पहिल्याच दिवशी आयसोलेशन प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यानंतर न्यूझीलंड मंडळाला कळवण्यात आले. तरीही आतापर्यंत या सहा खेळाडूंची नावे समजलेली नाहीत. आयसोलेशनदरम्यान सरावासाठी मिळालेल्या सूटवरही आता बंदी घातली आहे.

न्यूझीलंडमध्ये आयसोलेशन प्रोटोकॉलनुसार, पाकिस्तान संघाच्या सहा सदस्यांना आयसोलेशन सुविधेतून वेगळ्या ठिकाणी हलवले जाईल. यापूर्वी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानच्या फखर झमानलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो या दौऱ्यातून बाहेर पडला होता. पाकिस्तान संघाला या दौऱ्यात ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात टी२० सामन्याने होईल. यातील पहिला सामना १८ डिसेंबर रोजी ऑकलंड येथे खेळला जाईल. पाकिस्तान संघाने या दौऱ्यापूर्वी बाबर आझमला कसोटीचा कर्णधार म्हणून निवडले होते. ही त्याची कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. याव्यतिरिक्त आझम आधीपासूनच वनडे आणि टी२० क्रिकेट संघाचे नेतृत्त्व करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *