डॉक्टर शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपुरात पोस्टमॉर्टमसाठी दाखल

डॉक्टर शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपुरात पोस्टमॉर्टमसाठी दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम होणार आहे. आज सकाळी विष प्राशन करत डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केली होती.

डॉक्टर शीतल आमटे आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉक्टर विकास आमटे यांच्या कन्या आहेत. आनंदवनच्या संचालनातील अधिकारपदावरून आमटे कुटुंबियात गेले काही महिने वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी फेसबुक व्हिडीओ पोस्ट टाकून डॉक्टर शीतल आमटे यांनी काही कार्यकर्त्यांविरुद्ध आर्थिक अपहाराचे आरोप केले होते.

तर आमटे कुटुंबीयांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत या आरोपांचा इन्कार केला होता. पत्रकात शीतल आमटे मानसिक उपचार घेत असल्याचा दावा केला होता. दरम्यान, हे पार्थिव पोस्टमोर्टमनंतर पुन्हा आनंदवन येथे नेले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *