तेलंगणा : श्रीशैलम पॉवर स्टेशन मध्ये लागली भीषण आग, 2 जणांचा मृत्यू, तर 9 जणांचा तपास सुरू

हैद्राबाद : वृत्तसंस्था – तेलंगणा मधील श्रीशैलम येथील जमिनीलगत असणाऱ्या पनबिजली स्टेशनवर आज (शुक्रवारी) लागली. स्टेशनमधून आत्तापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार अजून 9 जण अद्याप सापडले नाहीत.

माहितीनुसार, तेलंगणाच्या लेफ्ट बँक पॉवर स्टेशन मध्ये शुक्रवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की तिथं असणाऱ्या इमारतींमध्ये धूर भरला होता. आग लागल्याची माहिती मिळताच आत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना काढण्याचा प्रयत्न केला गेला. वेळेवर पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 जणांना बाहेर काढलं.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कुरनुलच्या आत्मकुर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अजूनही काही लोक यामध्ये अडकले असल्याची शक्यता आहे. अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *