भरधाव कारनं ८ जणांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू; मुंबईत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

मुंबई | भरधाव कारनं ८ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित ४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

८ जणांना उडवल्यानंतर कारनं जनता नावाच्या कॅफेला धडक दिली. या अपघातात कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अपघातातील जखमींना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात कारच्या चालकालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती असून त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. आता या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. अपघातामागील कारणही शोधलं जात आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *