मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया जुन्या कर्मचाऱ्यांना कमावरुन काढणार असून लवकरच नविन कर्मचाऱ्यांसाठी भरती सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसबीआय ही बँक देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. एसबीआय बँकेने आज जुन्या 30000 हजार कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचा निर्णय घेतला आहे.
रिक्त जागांवर ताज्या दमाचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. एसबीआयही कर्मचारी फ्रेंडली आणि विस्तार करणार असल्याने पुढील तीन महिन्यात जुन्या कर्मचाऱ्यांच्या जागी 14000 हजार नविन कर्मचारी भरती केले जाणार असल्याची माहिती आहे.
31 मार्च 2020 पर्यंत एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2.49 लाख इतकी होती. बँकेने 30 हजार 190 कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचा निर्णय घेतला आहे. यात 11 हजार 565 अधिकारी आणि 18 हजार 625 कर्मचारी यांचा समावेश असेल. तसेच बँकेने व्हीआरएससाठीचा आराखडा तयार केला असून तो बोर्डाची मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.
दरम्यान, 31 मार्च 2019 मधी एसबीआय बँकेची कर्मचारी संख्या 2.57 लाख इतकी होती, आता 31 मार्च 2020 मधे 2.47 लाख इतकी आहे. खर्च कमी करण्यासाठी बँकेने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील असा अंदाज बँकेने वर्तवला आहे.