केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी; योगी आदित्यनाथ, त्रिवेंद्र सिंह रावत अडकले

नवी दिल्ली – केदारनाथ मंदिराचे द्वार बंद होण्यापूर्वी जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी पोहचलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अडकून पडण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथचे द्वार बंद होताच 8.30 वाजताच दोन्ही मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने उड्डाण घेत बद्रिनाथकडे रवाना व्हायचं होतं. मात्र बर्फवृष्टीमुळे हेलिकॉप्टरला उड्डाण घेणं शक्य नव्हतं. त्रिवेंद्र सिंह रावत आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडे बर्फवृष्टी थांबण्याची वाट पाहण्याशिवाय या मार्ग उरला नाही. केदारनाथ मंदिर आणि परिसरावर बर्फाची चादर पसरल्याचंच चित्र आहे. गंगोत्री धाममध्येही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे हवा जास्त थंड झाली आहे. या भागात थंडीचा कडाकाही वाढला आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट दिसून येऊ शकते. उत्तर भारतासहीत अनेक राज्यांत हवामानात अचानक बदल दिसून आला आहे. जम्मू – काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानसहीत अनेक राज्यांत रविवारी झालेल्या पावसामुळे अचानक पारा खाली आला. तसेच बर्फवृष्टीमुळे स्थानिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *