मुंबई, 09 मे : कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू नये म्हणून लागलेल्या लॉकडाऊनमुळे (Maharashtra Lockdown) अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली. अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने हजारो कामगार बेकार झले आहेत. एकट्या गेटवे ऑफ इंडिया (mumbai getaways) येथील पर्यटन बंद झाल्याने 10 हजार कामगार बेकार झाले आहेत. कोरोना काळात हॉटेल आणि पर्यटन व्यवसायात नुकसान होत असलेल्या मदतीचा हात द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर news 18 लोकमतने पर्यटन क्षेत्रचा आढावा घेतला. यात एकट्या गेटवे या पर्यटन क्षेत्र बंद असल्याने त्यावर उपजीविका करणारे दहा हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. गेट वेवर प्रतिदिनी सरासरी दीड लाख पर्यटक भेटी देतात. यात एलिफंटा गुफासाठी 60 हजार पर्यटक भेटी देतात. मांडावा किनाऱ्याची 50 हजार पर्यटक भेटी देतात. हार्बरसाठी 40 हजार पर्यटक भेटी देतात. पर्यटकांसाठी 82 डिलक्स लाँच आहे. यात 5 जणांची टीम काम करते. 5 केटामरान आहेत तर 15 स्पीड बोट आहेत, यात प्रत्येकी 5 लोकं कामावर आहेत. हे सर्व नियोजन पाहण्यासाठी 100 कामगार तर बुकिंग साठी काही कामगार आहेत. याच भागात पर्यटकांचे फोटो काढण्यासाठी 300 फोटोग्राफर, 100 फेरीवाले असे एकूण 5000 कर्मचारी आणि कामगार आणि त्यांच्यावर उपजीविका करणारे 20 हजार लोकं प्रभावित झाले आहेत. एकट्या गेट वे येथे प्रतिदिन 2 कोटी रुपयांचा पर्यटन उद्योग ठप्प झाला आहे. पर्यटक नसल्याने दक्षिण मुंबईतील किमान 300 हॉटेल रेस्टॉरंट, बार आणि त्यामध्ये काम करणार 3000 हजार कामगार प्रभावित झाले. देशात कृषीनंतर सर्वात जास्त रोजगार देणार क्षेत्र म्हणून पर्यटन व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत हे क्षेत्र अडचणीत आल्यावर त्याचा प्रभाव मोठ्या मनुष्यबळ बेरोजगार होत असते. या सर्व बाबी पाहता या उद्योगात नुकसान होणाऱ्या किमान कामगारांना तरी मदतीचा हात मिळावा ही अपेक्षा आहे.