चीन रॉकेट लाँग मार्च-5 बी: अनियंत्रित रॉकेटचे तुकडे हिंदी महासागरात कोसळले

नियंत्रण हरवल्यामुळे पुन्हा पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या चिनी रॉकेटचे तुकडे हिंदी महासागरात पडल्याचं चीनचं म्हणणं आहे. पुनर्प्रवेशादरम्यान रॉकेटचा मोठा भाग नष्ट झाला, परंतु काही भाग 72.47° पूर्व आणि 2.65° उत्तर या ठिकाणी पडले, असे वृत्त चीनच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे. हा भाग मालदीवच्या पश्चिमेला आहे. अमेरिका आणि युरोपियन ट्रॅकिंग साइट्स लाँग मार्च-5 बी वाहनाच्या अनियंत्रित घसरणीवर लक्ष ठेवून होते.चीनच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, रविवारी 10 वाजून 24 मिनिटांनी बीजिंगच्या वेळेनुसार (02:24 जीएमटी) रॉकेटचा काही भाग पुन्हा वातावरणात शिरला.   अमेरिकेच्या स्पेस कमांडरनेही रॉकेट पृथ्वीच्या वातावरणात परत आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एजन्सीने म्हटले आहे की, रॉकेटचे तुकडे जमिनीवर कोसळले आहेत की पाण्यात हे अद्याप कळू शकलेले नाही. रॉकेटवरील नियंत्रण सुटल्यानंतर त्याचे तुकडे एका वस्तीच्या भागात पडण्याची भीती होती. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन म्हणाले की, रॉकेटच्या बाबत चीनने निष्काळजीपणा केला आहे. गेल्या महिन्यात चीनच्या नवीन अंतराळ स्थानकाचे पहिले मॉड्यूल सुरू करण्यासाठी लाँग मार्च-5 बी वाहनातील मुख्य विभागाचा वापर करण्यात आला होता.

गेल्या काही दशकांतला 18 टनांचा सर्वात मोठा घटक नियंत्रण सुटल्यामुळे वातावरणात शिरलाय. अमेरिकेने गेल्या आठवड्यात सांगितले की, त्यांची यावर नजर होती. मात्र त्याला खाली पाडण्याची त्यांची कोणतीही योजना नव्हती. विविध अंतराळ कचरा मॉडेलिंग तज्ञांनी शनिवारी उशिरा किंवा रविवारी (जीएमटी) पहाटे हे तुकडे पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. वातावरणातून झेपावत असताना शेवटच्या टप्प्यात रॉकेट्चा मोठा भाग जळतो आणि यामुळे उच्च तापमानाला वितळणारे आणि उष्णतारोधक धातू जमिनीवरच राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

वर्षभरापूर्वी असंच प्रमुख टप्प्याच रॉकेट झेपावत असतानाच त्याचा तुकडा आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट येथील भूभागावर पडला तेव्हा ते रॉकेटमधला पाईपिंग असल्याचं समजण्यात आले. इतक्या मोठ्या वस्तूच्या अनियंत्रित परताव्याला परवानगी देण्यात निष्काळजीपणा केला आहे, या सूचनेवर चीनने भर दिला आहे. रॉकेटचे तुकडे महासागरातच पडणार असल्याची शक्यता वर्तवतानाच पाश्चिमात्य देशांनी मात्र हे धोकादायक असल्याचा बाऊ केल्याचं चीनच्या प्रसारमाध्यमानं म्हटलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *