राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघाती मृत्यू

बंगळुरू | राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेला कन्नड अभिनेता संचारी विजय याचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याच्या मृत्यूनंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात असून चाहत्यांना देखील रडू कोसळलं आहे. मात्र या अभिनेत्याच्या भावाने जी माहिती दिली त्याने कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. तसेच प्रत्येकाला अभिमान देखील वाटेल. विजय याला बाईकवर फिरायला फार आवडत असे. अशातच शनिवारी सकाळी मित्राच्या घरुन परतत असताना विजय याचा अपघात झाला. यावेळी तेथील लोकांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. विजयच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचं मोठ्या प्रमाणात रक्त वाहिलं होतं. यामुळे विजय कोमामध्ये गेला.

तब्बल 48 तास डाॅक्टर आणि सर्जननी उपचार करुन देखील उपचारादरम्यानच विजयचा मृत्यू झाला. यानंतर दक्षिणात्य सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगरच कोसळला. 2015 साली ‘नानु अवानल्ला अवालु’ या चित्रपटातून संचारी विजय यांनी आपली ओळख निर्माण केली होती. यामध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दरम्यान, विजय यांचे मोठे भाऊ सिद्धेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे अवयव ते दान करणार आहेत. या अवयवांच्या माध्यमातून विजय आपल्यात कायम जिवंत राहतील, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *