नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात सुमारे 69 हजार 652 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने 28 लाखांचा टप्पा सुद्धा ओलांडला आहे. देशात सध्या 6 लाख 6 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर कोरोनामुळे तब्बल 53 हजार 866 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 28 लाख 36 हजार 925 वर पोहोचला असून, 2 लाख 96 हजार 664 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा महाराष्ट्र सुरू असून, महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमाकांवर आहे. गेल्या 24 तासात राज्यात पुन्हा 13 हजार 165 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 6 लाख 28 हजार 642 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे 21 हजार 33 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असून, तेथील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 लाख 55 हजार 449 वर पोहोचला आहे. तर 6 हजार 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश असून, तेथील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 16 हजार 3 वर पोहोचला आहे. तर सुमारे 2 हजार 906 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.