मुंबईत आजही कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पार; मृत्यूंचा आकडाही वाढला!

Mumbai Corona Updates: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण दुसरीकडे राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट अजूनही सुरूच आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल १०,०१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ७,०१९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईत सध्या ७७ हजार ४९५ सक्रिय रुग्ण आहेत. चिंताजनक बाब अशी की रुग्ण संख्येसोबतच मृत्यूंचाही आकडा वाढताना दिसतो आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *