पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील न्यायालयीत कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयने पुन्हा नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार सात एप्रिलपासून न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये चारच तास सुरू राहणार आहे.
महिन्यातील प्रत्येक शनिवारी न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्यात येणार असून, त्या दिवशी फक्त रिमांड आणि महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. सध्या न्यायालयामध्ये अडीच तासाच्या दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू आहे. मात्र, ७ एप्रिलपासून न्यायालयातील कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू राहिल. मात्र, शिफ्ट अडीच तासाची न राहता ती दोन तासांची करण्यात आली आहे. शक्यत्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घ्यावी. वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी यांच्या गैरहजेरीत कोणताही आदेश होणार हीत. न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहिल.
न्यायालयामध्ये दैनंदिन बोर्डावर मोजक्याच तारखांचा उल्लेख करण्यात येणार आहे. बोर्डावर उल्लेख असलेल्या खटल्यांचेच कामकाज त्या दिवशी चालले. तसेच संबंधीत खटल्यातील पक्षकार, वकीलांना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू असणार आहेत. महत्वाचे काम असणा-या पक्षकारांना न्यायालयाच्या आवारामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळावी. तसेच सर्वांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर तात्काळ न्यायालयाच्या बाहेर पडावे.
अॅड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
कौटुंबिक न्यायालयाची देखील वेळ झाली कमी
कौटुंबिक न्यायालयातील कामकाज देखील सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. तसेच न्यायालयामध्ये ५० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू राहणार आहे. यावेळी अनुपस्थित पक्षकार, वकीलांच्या विरुद्ध कोणताही आदेश दिला जाणार नाही. गरज असेल तरच पक्षकार, वकीलांनी न्यायालयात उपस्थित रहावे, अशी माहिती दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.