सावधान! बॉडी बनवण्यासाठी भरपूर अंडी खाताय गंभीर आजाराला निमंत्रण देताय

अंड्यामध्ये (egg) प्रोटिन, जीवनसत्वं, क्षार आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे अंडं पौष्टीक मानलं जातं. म्हणून लहान मुलांना अंडी खायला दिली जातात. याशिवाय जे जीमला जातात ते आपली बॉडी बनवण्यासाठी अंडी खातात. अंडं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी भरपूर प्रमाणात खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.

अंडं आरोग्यासाठी चांगलं की वाईट याबाबत तज्ज्ञांचं दुमत आहे. अंडी खाल्ल्यानं उच्च कॉलेस्टेरॉलची समस्या निर्माण होऊ शकते, असं याआधीच्या एका अभ्यासात दिसून आलं आहे. त्यामुळे जगभरातील आहार तज्ज्ञ आणि डॉक्टर यांनी अंडी कमी खावी असा सल्ला द्यायला सुरुवात केली आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते, अंड्यामध्ये कोलेस्टेरॉल असलं तरी अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढतेच असं नाही. अंडी आपण कशा पद्धतीनं खातो यावर त्याचे परिणाम अवलंबून आहेत. अंडी उकडून खाल्ल्याने शरीरात जितकी कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, त्यापेक्षा जास्त लोणी आणि चीज यासोबत अंड्यांचे पदार्थ बनवल्यास वाढते.

अंड्यामुळे मधुमेहाचा धोका

अंडी खाण्याचा आणि मधुमेह होण्याचा संबंध याविषयीदेखील वाद आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, अंडी खाल्ल्यानं रक्तशर्करा वाढते आणि त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. ब्रिटीश जर्नल ऑफ न्युट्रिशनध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासाताही आता असाच दावा करण्यात आला आहे. हा अभ्यास 1991 ते 2009 या कालावधीत करण्यात आला. जे लोक दररोज एकापेक्षा जास्त अंडी म्हणजे 50 ग्रॅम अंडी खातात त्यांना मधुमेह होण्याचा धोका 60 % वाढतो. दररोज 38 ग्रॅम अंडी खाल्ल्यानंदेखील मधुमेह होण्याचा धोका 25% वाढतो.

अंड्यांचे इतर दुष्परिणाम

अंड्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढत असल्याचं वरील अभ्यासात नमूद केलं असलं तर अति प्रमाणात अंडी खाण्याचे इतर दुष्परिणाही आहेत.

1) अमेरिकन हार्ट असोसिएशननं दररोज एक अंडं खाणं शरीरास हानिकारक नाही, असं म्हटलं असलं तरी अंड्याचं अति सेवन हे हृदयरोगाचा धोका वाढवतं.

2) काही अभ्यासांनी अति प्रमाणात अंड्यांचं सेवन हे कोलोन, रेक्टल आणि प्रोस्टेट कॅन्सरला कारणीभूत होऊ शकतं असं स्पष्ट केलं आहे. तरीही या संदर्भातील वादाबद्दल अजून संशोधन आणि पुराव्यांची गरज आहे.

3) एकाच वेळी किंवा दिवसात खूप जास्त अंडी खाल्ल्यानं शरीरातील उष्णता वाढते. त्याने शरीरात पचनाच्या समस्या निर्माण होतात. जर शरीर उष्णता सहन करू शकलं नाही तर शरीरावर पुरळ उठतात.

4) कच्ची न शिजवता अंडी खाल्ली तर साल्मोनेला आणि लिस्टेरिओसिस यांचा धोका वाढतो. हे असे संसर्ग आहेत ज्यानं पचनाच्या समस्या निर्माण होतात. त्यांचा धोका गर्भवती महिलांना अधिक असतो. म्हणून त्यांना योग्य प्रकारे शिजवलेली ताजी अंडी खाण्यास दिली पाहिजे.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – मधुमेह

न्यूज18वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *