नवी दिल्ली, 9 मे : नेटफ्लिक्सकडून (Netflix) आपल्या युजर्ससाठी नेहमी नवा कंटेंट दिला जातो. अशात लॉकडाउनमुळे मूव्ही आणि शोजचं शूटिंग थांबलं आहे. त्यामुळे नवे शोज, मूव्ही नसल्याने आता युजर्सला आकर्षित करण्यासाठी कंपनीने N प्लस सब्सक्रिप्शनची घोषणा केली आहे. सध्या नेटफ्लिक्सकडून या प्लॅटफॉर्मचं टेस्टिंग सुरू आहे. या सब्सक्रिप्शननंतर युजर्सला मूव्ही आणि वेबसीरीजचे Behind the Scenes पाहता येणार आहेत. एखादा मूव्ही किंवा शो बनवताना त्यामागे नेमकं कसं काम चालतं हे या सब्सक्रिप्शनमुळे पाहता येणार आहे. यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म एका सर्व्हेचं आयोजन करत आहे. या सर्व्हेच्या मदतीने कंपनी निर्णय घेईल. नेक्स्ट वेबने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. ग्राहकांना मेलद्वारे सर्व्हे पाठवला जात आहे. यात N प्लससंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. या नव्या N-Plus मुळे युजर्सला नेटफ्लिक्स शोबाबत माहिती मिळेल. यात नेटफ्लिक्स ओरिजिनल्सचाही समावेश करण्यात येणार आहे. कंटेटमध्ये युजर्सला टेक्स्ट, फोटो, व्हिडीओ फीड, मिळेल. तसंच न्यूज, इंटरव्ह्यू, एनालिसिस, पॉडकास्टसाठीही साईन-अप करता येणार आहे.
या सर्विसची खास बाब म्हणजे, यासाठी युजरला कोणतंही पेमेंट करण्याची गरज लागणार नाही. युजरकडे जो नेटफ्लिक्सचा प्लॅन असेल, त्याच्याच मदतीने हे पाहता येणार आहे. N प्लस गुगल सर्चद्वारेही शोधता येऊ शकतं. कोणत्याही शोचं नाव, कास्ट टाकून हे पाहता येणार आहे. युजरला तेच Behind the Scenes पाहता येणार आहेत, जे प्लॅटफॉर्मवर उपबल्ध असतील किंवा कंपनीने जे अपलोड केले आहेत.